महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राजकीय गदारोळ माजला असून विधानसभा निवडणुकीच्या तारखा समोर आल्या आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.
Sharad Pawar : शरद पवार यांची स्पष्टोक्ती, 90 वर्षांचा झालो तरी महाराष्ट्राला मीच योग्य रस्त्यावर आणणार, पक्षाची सूत्रे कुणालाही देणार नाही
तसेच चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या,आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय… असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केली जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App