नवी दिल्ली – अभाविप आणि जेएनयूएसयू या प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. विद्यार्थी संघटना सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यावरून वादावादी झाली.Clashes between students in JNU
यावरून जेएनयूएसयू आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केला आहे. जेएनयूएसयूशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने याबाबात निवेदन जारी केले आहे. त्यानुसार नेहरू जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी सभागृहाचे आरक्षण केले होते.
संयोजक विद्यार्थी सभागृहात गेले तेव्हा अभाविपच्या सुमारे १५ कार्यकर्त्यांनी ते ठिकाण ताब्यात घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तेथून जावे असे समजावण्याचा प्रयत्न एआयएसएच्या कार्यकर्त्यांनी केला, मात्र अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आमचे कार्यकर्ते सभागृहाबाहेर आले आणि त्यांनी अभाविपच्या विरोधात घोषणा दिल्या.
त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारामारी सुरु केली. त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांनाही चोपून काढले. मग विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना निघून जाण्यास भाग पाडले.अभाविपने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, आमच्या कार्यकर्त्यांना सभागृहात बैठक घेण्यापासून रोखण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App