वक्फ बोर्डाच्या नावाखाली हजारो एकर जमीन हडपली, त्यावर लगाम आवश्यकच; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांनी बजावले!!

Waqf Board

वृत्तसंस्था

पाटणा : वाट्टेल त्या मालमत्तेवर आणि संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणण्याची शक्यता आहे, त्याचे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार आब्बास नक्वी यांनी जोरदार समर्थन केले. bring a bill to curb powers of Waqf Board over assets

वक्फ बोर्ड सुधारणा कायदा विधेयक आणणे हे फार महत्वाचे आहे. एकदा वक्फ बोर्डाने एखादी जमीन त्यांची आहे, असा दावा केल्यावर त्यावर कुठली सुनावणी होत नाही. वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशाच्या विविध भागात हजारो एकर जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या जमिनीचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गरिबांच्या जमिनींवर अतिक्रमण केले जाते. वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश लावला, तर गरीब मुस्लिमांना देखील फायदा होईल. त्यांच्या घरांवर जमिनीवर आणि मालमत्तांवर कोणी अवैध कब्जा करू शकणार नाही. त्यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा कायदा आवश्यक आहे, असे जतीन राम मांझी यांनी स्पष्ट केले.



 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, आपल्याला कुणी हात लावू शकत नाही, या घमेंडीतून वक्फ प्रणालीला बाहेर काढण्याची गरज आहे. सर्वसमावेशक सुधारणेवर जातीयवादी मानसिकता लादणे हे दोन्हीसाठी चांगले नाही, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर तार्किक तोडगा काढणे ही काळाची गरज वक्फ बोर्डाने समजून घ्यायला हवी. सरकारकडून नेमका प्रस्ताव काय आहे हे माहिती नाही, पण मला विश्वास आहे की वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याची आता निश्चित गरज आहे.

bring a bill to curb powers of Waqf Board over assets

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात