तमिळनाडूत भाजपचा स्वतंत्र राजकीय चंचुप्रवेश; स्थानिक निवडणुकांमध्ये द्रमुक अण्णाद्रमुक पाठोपाठ तिसरा मोठा पक्ष!!


प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले असून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमने यात जोरदार मुसंडी मारली आहे. सर्व जागा मिळून 4000 पेक्षा अधिक जागा वॉर्ड द्रविड मुन्नेत्र कळघमने मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. त्याखालोखाल 2000 हून अधिक जागा अण्णा द्रमुकने जिंकल्या आहेत. परंतु सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती तामिळनाडूत स्थानिक पातळीवर भाजपची स्वतंत्र एंट्री…!!BJP’s independent political presence in Tamil Nadu; DMK is the third largest party after AIADMK in local elections

भाजपने या वेळी प्रथमच कोणत्याही स्थानिक पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या व्युहरचनेनुसार भाजपला तामिळनाडूत स्वतंत्रपणे अस्तित्व दाखवायचे असेल तर कोणत्याही स्थानिक पक्षाबरोबर युती करण्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक लढवावी, असे त्यांचे मत होते.



अन्नामलाई यांचे हे मत आजच्या निकालांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसले. चेन्नई सह 9 महापालिकांमध्ये भाजपने कमळ चिन्हावर 22 वॉर्डमध्ये विजय मिळवला, तसेच नगरपरिषदांमध्ये 58 वॉर्डांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर नगरपंचायतींमध्ये तीन आकडी संख्या गाठत 233 वॉर्डांमध्ये भाजपला यश मिळाले.

आत्तापर्यंत जेथे भाजपचे राजकीय अस्तित्वही नव्हते, कमळ चिन्ह पोहोचलेही नव्हते तेथे भाजपने विजय मिळवल्याचे ट्विट अण्णामलाई यांनी केले आहे.अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णाद्रमुक यांच्या तुलनेत भाजपचे हे यश संख्यात्मक पातळीवर कमी असले

तरी ज्या राज्यामध्ये भाजपचे राजकीय अस्तित्व अतिशय नगण्य होते त्या तामिळनाडूत आता स्थानिक पातळीपर्यंत भाजप पोहोचला आहे.आणि त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत हे या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

BJP’s independent political presence in Tamil Nadu; DMK is the third largest party after AIADMK in local elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात