आंध्र, तमिळनाडूत हाय अलर्ट, चक्रीवादळाचा इशारा, चैन्नईत पावसाचे थैमान


विशेष प्रतिनिधी

चेन्नई – सध्या सागरामध्ये निर्माण झालेले वादळ उत्तर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हायअलर्टचा इशारा दिला आहे.High alert in Andhra, Tamil Nadu, cyclone warning

तमिळनाडूची वर राजधानी चेन्नईला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर विमानांच्या एंट्रीला ब्रेक लावण्यात आला होता.


Narendra Giri Suicide Case: महंत नरेंद्र गिरी यांना व्हिडिओवरून ब्लॅकमेल केले जात होते, सपा सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यावर संशय


 

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज सायंकाळपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकू शकते त्यामुळे शहरात ताशी ४५ किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीने चौदा लोकांचा बळी घेतला आहे. उत्तर चेन्नई, तिरूवल्लूर, चेंगेलपेट, कांचीपुरम, राणीपेट, विल्लूपुरम आणि कुड्डालोर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे.

High alert in Andhra, Tamil Nadu, cyclone warning

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात