नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने मायावती आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे जातीय राजकारण करीत असल्याची टीका केली आहे.मायावती यांनी सत्ता हाती आल्यास उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबद्दल भाष्य केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी टीका केली आहे.BJP targets Mayawati, Owesi
ते म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री पाच कोटींचा हार बाजूला ठेवत बाहेर आल्या आहेत, हे लोकशाहीसाठी चांगले आहे. परंतु याच बसपने पूर्वी ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ अशी घोषणा दिली होती. जे लोक जनतेसाठी काहीच काम करीत नाही.
त्यांना निवडणुकीत अशाप्रकारे जातीयवादी राजकारणाचा आधार घ्यावा लागतो.’’भाटियांनी ओवैसी यांच्यावरही टीका केली. ओवैसी जिथे जातील, तिथे ते राजकीय विष पेरतील. परंतु उत्तर प्रदेशची जनता सुज्ञ आहे. ते विकासालाच मतदान करतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App