इन्कमिंगला फिल्टर, मोदींचे दौरे झंझावाती, भाजपची तगडी तयारी; आंध्रात भाऊ – बहीण तोडून काँग्रेसची मोठी उडी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपमध्ये इन्कमिंगला फिल्टर लावत, मोदींचे दौरे झंझावाती आखत भाजपने लोकसभा निवडणुकीची तगडी तयारी केली, तर आंध्र प्रदेशात भाऊ – बहीण एकमेकांपासून तोडून काँग्रेसने मोठी उडी टाकली!! 2024 च्या पहिल्या दोन दिवसांमधल्या या घडामोडी आहेत. BJP strongly strengthening its strategy, Congress making rift in ysr family in andhra Pradesh

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाशनाड्डा यांनी आज भाजपच्या मुख्यालयात तब्बल 150 नेत्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने एक मोठे पाऊल टाकले 22 जानेवारीच्या राम मंदिराच्या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंजावती दौऱ्याचा आराखडा या बैठकीत ठरविला त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि स्वतः जे. पी. नड्डा हे संपूर्ण देशाचा फॉलोअप दौरा करतील.

त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंगला फिल्टर लावण्यासाठी पक्षाने 8 नेत्यांची एक समिती गठित केली आहे. यामध्ये 4 केंद्रीय मंत्री तीन सरचिटणीस आणि एका मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया आणि धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्री या समितीत असून विनोद तावडे, तरुण चूग आणि हेमंत विश्वशर्मा यांचाही या समितीत समावेश आहे. या 8 नेत्यांच्या समितीने मंजुरी दिल्याशिवाय देशात कुठल्याही राज्यांमध्ये कुठल्याही नेत्यांना भाजपमध्ये परस्पर प्रवेश देता येणार नाही. ही समिती भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची सर्व प्रकारचे बॅकग्राऊंड तपासूनच त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास ग्रीन सिग्नल दाखवेल आणि त्यानंतरच कोणत्याही नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होईल.



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुकूल राजकीय काळात अनेक पक्षांमध्ये दुर्लक्षित झालेले किंवा आऊटडेटेड झालेले नेते भाजपच्या वळचणीला येऊन बसू शकतात, पण त्यांचा पक्षाला फायदा होईल की तोटा होईल, हे लक्षात घेऊन ही फिल्टर समिती संबंधित नेत्यांचा भाजप मधला प्रवेश देणे अथवा नाकारणे निश्चित करणार आहे.

काँग्रेसने राजशेखर रेड्डी यांचे घर फोडले

“इंडिया” आघाडीत जागा वाटपाचा अजूनही घोळ सुरू असताना काँग्रेस मात्र मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. तेलंगणा या राज्यात भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव करून सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसने आज आंध्र प्रदेशात एक दमदार पाऊल टाकले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांना काँग्रेसमध्ये घेऊन जगन जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला काँग्रेसने सुरुंग लावला आहे. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा मुलगा आणि मुलगी यांच्यातल्या मतभेदाचा काँग्रेसने फायदा उचलला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दक्षिणेकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करताना तेलंगण पाठोपाठ आंध्रमध्ये देखील आपली स्थिती मजबूत करण्यासाठी ही चाल खेळली आहे.

मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसपुढे पेच!!

“इंडिया” आघाडीतले जागावाटप अजूनही लटकलेलेच आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला आपल्याच आघाडीतल्या घटक पक्षांबरोबर रेटारेटी करून जागा वाढवून घ्याव्या लागत आहेत, पण आंध्रमध्ये मात्र राजशेखर रेड्डी यांचे घराणे फोडून काँग्रेसने तिथे मोठी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP strongly strengthening its strategy, Congress making rift in ysr family in andhra Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात