जपाननंतर म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर मोजली गेली 4.3 तीव्रता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जपानमध्ये सोमवारचा दिवस खूप भीतिदायक होता. येथे 90 मिनिटांत 4.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे 21 भूकंप जाणवले. यापैकी एका भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी मोजली गेली. या भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला होता. आता म्यानमार आणि भारतातील लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.After Japan, Myanmar was hit by an earthquake measuring 4.3 on the Richter scale

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, म्यानमारमध्ये 2 जानेवारीला 3:15 मिनिटे 53 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये जमिनीखाली 85 किलोमीटर खोलीवर आहे.



यापूर्वी भारतातील लडाखमध्येही छोटा भूकंप झाला होता. एनसीएसनुसार, लडाखमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजली गेली. त्याचे धक्के 1 जानेवारी रोजी 10:15 मिनिटे आणि 29 सेकंदांनी जाणवले. त्याचे केंद्र भूगर्भात 10 किलोमीटर खोलीवर होते.

भूकंपामुळे जपानमध्ये विध्वंस

जपानमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपानंतर 34 हजार घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. भूकंपामुळे रस्त्यांना तडे गेल्याने देशातील अनेक प्रमुख महामार्ग बंद करावे लागले. रशियन न्यूज एजन्सी ताशने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या पश्चिम किनार्‍यावरील काही भागात त्सुनामीचा धोका आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

After Japan, Myanmar was hit by an earthquake measuring 4.3 on the Richter scale

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात