पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सुरू झालेला उघड हिंसाचार आता कमी झाला आहे. मात्र, आता भाजपाच्या समर्थकांना शोधून शोधून लक्ष्य केले जात आहे. अनेकांना फाशी देऊन मारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. BJP got majority of votes at its booth, this is the crime, body was found hanging from a tree today
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सुरू झालेला उघड हिंसाचार आता कमी झाला आहे. मात्र, आता भाजपाच्या समर्थकांना शोधून शोधून लक्ष्य केले जात आहे. अनेकांना फाशी देऊन मारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
फाल्टा विधानसभा मतदारसंघात ज्या बुथवर भाजपाला मताधिक्य मिळाले होते त्या बुथप्रमुखाचा मृतदेह झाडाला लटकवलेला सापडला. फाल्मा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अरविंद मिडी यांचा मृतदेह झाडाला लटकवलेला सापडला. त्यांच्या बुथवर भाजपाने मताधिक्य मिळविले होते.
नादिया जिल्ह्यातील रोआवारी गावातील मंडलपारा गावात एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. दिलीप कार्तनिया असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. बुथस्तरावर ते काम करत होते. मतदानाच्या दिवशी काही गुंडांनी त्यांना धमक्याही दिल्या होत्या. त्यानंतर ते कोणालाही दिसले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेहच सापडला.
कुचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा टाऊन मंडल अध्यक्ष अमित सरकार यांचाही मृतदेह सापडला. सरकार यांचाही खून करून त्यांचा मृतदेह गावात लटकविण्यात आला होता. तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनीच सरकार यांची हत्या केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आल आहे. आम्हाला घाबरविण्यासाठीच तृणमूलच्या गुंडांकडून हिंसाचार सुरू आहे, असा आरोपही भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही. त्यांच्याविरुध्द लढा देतच राहूू, असा निर्धारही भाजप कार्यकर्ते करत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते कैलास विजयवर्गीिय यांनी ट्विट करून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मारहाणीची तक्रार केली आहे. भाजयुमोचे सचिव संभू सरकार यांना मारहाण करण्यात आली. सुदैवाने ते त्यातून वाचले. मात्र, त्यांचे पूर्ण कुटुंब मारहाणीत जखमी झाले आहे. रुग्णालयात उपचार घेतला जात आहे. मात्र, यावर पोलीसांनी काहीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/IndranilKhan/status/1393840704103747588?s=20
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App