विशेष प्रतिनिधी
कोलकता :मृत व्यक्तीचा देह आणायला गेल्यानंतर संबंधित व्यक्ती चक्क कॉटवर बसलेला दिसला तर तुमची बोबडीट वळेल. पण असा प्रकार प. बंगालमध्ये घडला आहे.Live person get death certificate
मृत्युचा दाखला जारी करण्यात आल्यानंतर कर्मचारी मृतदेह आणायला रुग्णालयात गेला तर रुग्ण खाटेवर बसला असल्याचे त्यांना आढळून आले. कल्याणी येथील नेताजी सुभाष कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला.
हिजुली येथील एका २६ वर्षीय तरुणाला कोरोना संसर्गाचे निदान झाल्यामुळे कल्याणीत हलविण्यात आले. त्याच्यावर गेले चार दिवस उपचार सुरु होते. त्याचे निधन झाल्याचा संदेश शुक्रवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने कुटुंबीयांना पाठविला. त्यांना शनिवारी मृत्युचा दाखला देण्यात आला.
स्मशानभूमीचे कर्मचारी रुग्णालयात गेल्यानंतर हा तरुण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूच्या प्रमाणपत्रावर त्याच्या वडीलांचे निधन झाल्याचाही उल्लेख होता, मात्र प्रत्यक्षात ते हयात आहेत.
या प्रकारानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणाला दुसऱ्या रुग्णालयात हलविले. याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, तसेच पूर्ण माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App