राजधानी दिल्लीत पुन्हा लॉकडाउनमध्ये वाढ, परिस्थीतीत मात्र वेगाने सुधारणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवी दिल्लीत कोरोना उद्रेकाची परिस्थिती आता परिस्थिती झपाट्याने सुधारत असल्याचा दावा करतानाच, सावधगिरीचा उपाय म्हणून लॉकडाउन आठवडाभरासाठी म्हणजे २४ मे पर्यंत वाढविण्याची घोषणामुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली.Delhi once again extends lockdown

दिल्लीत रुणसंख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र सारे व्यवहार एकदम खुले केले तर, पहिल्या लाटेनंतरची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे, असे सांगून केजरीवाल म्हणाले की राज्य सरकारने प्रत्येक वेळा लॉकडाउन वाढवताना विचारात घेतले आहे.



मुख्य व्यापारी संघटना आणि दिल्लीकरांनीही प्रत्येक वेळेला लॉकडाउन एकेका आठवड्याने वाढवण्याच्या बाजूने कौल दिला आहे.कोरोना रुग्णांची संख्या मागील चोवीस तासांमध्ये ६ हजार ४०० च्या आसपास आली.

संक्रमण दरदेखील ११.३२ टक्क्यांपर्यंत घटला आहे. मात्र रोज मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या अजूनही तीनशेच्या आसपास आहे. त्यामुळेच दिल्लीकरांना सावधगिरीचा उपाय बाळगावा लागेल असे सांगत

केजरीवाल यांनी वाढीव लॉकडाउनचे समर्थन केले.१९ एप्रिलला केजरीवाल यांनी पहिला सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. तो आता पाचव्यांदा वाढवून २४ मे रोजी पहाटे ५ पर्यंत कायम ठेवला आहे.

Delhi once again extends lockdown

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात