विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लस तुटवड्यावरून अडचणीत आलेल्या सरकारच्या लसनिर्यात धोरणावर सवाल उपस्थित होत आहे. अशात दिल्लीमध्ये काही तरुणांनी पंतप्रधानांना सवाल करणारे भित्तीफलक लावल्यामुळे खळबळ उडाली होती.Rahul Gandhi targets PM modi
यानंतर दिल्ली पोलिसांनी भित्तीफलक प्रकरणात कारवाई करताना काही जणांना अटक केली. मात्र दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे.
राहुल गांधींनी या निमित्ताने सरकारवर हल्ला चढविताना मोदीजी आमच्या मुलाबाळांसाठीची लस परदेशात का पाठविली? असा सवाल असलेला फलक ट्विट करून ‘मलाही अटक करा’, असे आव्हान दिले.
कोरोना व्यवस्थापनातील त्रुटींवरून सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसतर्फे सातत्याने लक्ष्य केले जात आहे. मोदींच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम थांबवावे, संपूर्ण लॉकडाउन करावे. तसेच, तसेच सरसकट सर्वांचे मोफत लसीकरण व्हावे,
या मागण्या करताना राहुल गांधींनी गंगानदीत सापडलेल्या बेवारशी मृतदेहांवरून पंतप्रधान मोदींवर, ‘गंगेने बोलावले असे म्हणणाऱ्यानेच गंगामातेला रडविले,’ अशा कठोर शब्दांत प्रहार केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App