विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई – महाराष्ट्रातील तीन शहरात उसळलेल्या जातीय दंगलीच्या विरोधात नवी मुंबई भाजपच्या वतीने जिल्हाअध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले व महाराष्ट्र सरकारचा निषेध केला.BJP aggressive against Three city riots
यावेळी भाजप नेते सतीश निकम,कृष्णा पाटील,युवक जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.रामचंद्र घरत म्हणाले की, शिवसेना सरकार मालेगाव, नांदेड, अमरावती येथील हिंसाचारावर एकतर्फी कारवाई करत आहे. १२ तारखेला एका विशिष्ट समाजाने जाणूनबुजून दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली,
याला प्रत्युत्तर म्हणून १३ तारखेला दुसऱ्या समाजाने शांततेत आंदोलन केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना अटक करून हिंसाचार पसरवणाऱ्या संरक्षण देत आहे.तसेच पेट्रोल, डिझेल दराबद्दल देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App