देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील.’Bharat Gaurav’ train to be launched, tourism in the country will get a boost; Railway Minister Ashwini Vaishnav made the announcement
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंगळवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. देशात सध्या १८० भारत गौरव ट्रेन चालवण्याची योजना आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक कोचेस असतील. रेल्वेनं यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळत आहे.तसेच यासाठी अर्ज घेण्यासही सुरुवात झाली आहे.
भारत गौरव ट्रेनच्या सेवेचे नियंत्रण खासगी आणि आयआरसीटीसीद्वारे करण्यात येणार आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील. तर देखरेख, पार्किंग आणि इतर सुविधांसाठी आयआरसीटीसी मदत करणर आहे, ही नियमित रेल्वे सेवा नसून हा वेगळा प्रयोग असल्याचे वैष्ण यांनी सांगितले.
We've allocated over 180 trains for ‘Bharat Gaurav’ trains & 3033 coaches identified. We'll start taking applications from today. We've received good response. Stakeholders will modify & run the train & Railways will help in maintenance, parking & other facilities: Railways Min pic.twitter.com/Hpw90xnzu3 — ANI (@ANI) November 23, 2021
We've allocated over 180 trains for ‘Bharat Gaurav’ trains & 3033 coaches identified. We'll start taking applications from today. We've received good response. Stakeholders will modify & run the train & Railways will help in maintenance, parking & other facilities: Railways Min pic.twitter.com/Hpw90xnzu3
— ANI (@ANI) November 23, 2021
तसेच यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय मार्ग ठरवण्याचे अधिकार कंपनीला असतील. भारत गौरव ट्रेन खाजगी क्षेत्र आणि IRCTC दोन्हीद्वारे चालवली जाऊ शकते. या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App