केरळमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग; 8 दिवसांत 3500 पक्ष्यांचा मृत्यू; प्रशासनाचा दावा- मानवांमध्ये पसरण्याची शक्यता नाही

वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात दोन ठिकाणी जीवघेणा बर्ड फ्लू पसरल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. येथे एडठवा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 आणि चेरुथना ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मधील बदकांमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे.Bird flu outbreak in Kerala; 3500 birds died in 8 days; Administration claims – no possibility of spread to humans

12 एप्रिलपासून एडठवा येथे 3 हजार पक्षी तर चेरुथना येथे 250 पक्षी मारले गेले आहेत. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यांच्यामध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली. आता येथे 21 हजार पक्षी मारले जाणार आहेत.



एक किलोमीटरच्या परिघात बदकांना मारणार

बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली, ज्यामध्ये इन्फेक्टेड केंद्रापासून एक किलोमीटरच्या परिघात संक्रमित पक्षी मारून नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. यासाठी जलद कृती दल तयार करण्यात येत आहे. त्यासोबतच प्राणी कल्याण विभागानेही तयारी सुरू केली आहे.

हा आजार माणसात पसरण्याची शक्यता नसल्याने विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Bird flu outbreak in Kerala; 3500 birds died in 8 days; Administration claims – no possibility of spread to humans

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात