सत्येंद्र जैन हे वैद्यकीय कारणास्तव नऊ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगाबाहेर होते. Big blow to AAP leader Satyendar Jain Supreme Court orders immediate surrender
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाईचा सामना करत असलेले दिल्ली सरकारचे माजीमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने माजी मंत्र्याला तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
सत्येंद्र जैन हे वैद्यकीय कारणास्तव नऊ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगाबाहेर होते. सर्वोच्च न्यायालयाने 26 मे 2023 रोजी जैन यांना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि तो वेळोवेळी वाढवला गेला आहे. ED ने 30 मे 2022 रोजी त्यांना त्यांच्याशी संबंधित असलेल्या चार कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. जैन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App