बांताक्रुझ ! नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी आणखी एक प्रस्ताव, तणाव कमी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांचा संता- बांता जोकचा आधार


नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाहून राजकीय वातावरण तापले आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वातावरण हलके करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी आणखी एक प्रस्ताव असल्याचे सांगितले आहे तो म्हणजे बांताक्रुझ!Bantacruz! Another proposal for naming Navi Mumbai Airport, Civil Aviation Minister Hardeep Singh Puri’s Santa-Banta Joke base to reduce tensions


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाहून राजकीय वातावरण तापले आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वातावरण हलके करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी आणखी एक प्रस्ताव असल्याचे सांगितले आहे तो म्हणजे बांताक्रुझ!

स्वत: शिख समाजाचे असले तरी अत्यंत खिलाडूपणे हरदीपसिंग पूरी यांनी संता- बांताच्या विनोदाचा आधार घेत वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. गायक- अभिनेत्री सचित्रा कृष्णमूर्ती यांनी पूरी यांना एक ट्विट टॅग केले होते.



त्यामध्ये म्हटले होते की बांताने नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना एक पत्र पाठिविले आहे. त्यामध्ये प्रामाणिकपणे विनंती केलीआहे की माझ्या भावाच्या नावाने सांताक्रुझ हे नाव मुंबईतील विमानतळ आहे. त्यामुळे नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला माझे नाव देऊन बांताक्रुझ असे करावे!

पूरी यांनीही हा विनोद पुढे नेत म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे अस्तित्वात असलेल्या आणि उभारणी होत असलेल्य विमानतळांच्या नामकरणासाठी अनेक प्रस्ताव येत आहेत. मात्र, माझा मित्र बांता याच्या नावाने अद्याप अधिकृत मागणीचा अर्ज आलेला नाही.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त 24 जून रोजी सिडकोला घेराव घालणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांकडून महामोचार्चे आयोजन केले आहे.

नवी वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम आहे. मात्र, रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे.

दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉपोर्रेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती.

त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. दि. बा. पाटील यांनी २०१२ साली अखेरचा लढा देत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाची मागणी सरकारकडून मान्य करून घेतली.

Bantacruz! Another proposal for naming Navi Mumbai Airport, Civil Aviation Minister Hardeep Singh Puri’s Santa-Banta Joke base to reduce tensions

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात