अयोध्येतले राम मंदिर आणि नवीन मशीद भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक; मुस्लिम लीगच्या नेत्याचे वक्तव्य, पण काँग्रेसची टीका!!

विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपुरम : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात बालक राम सुप्रतिष्ठित झाल्यानंतर अनेक राम मंदिर विरोधकांच्या भूमिका बदलल्या यापैकीच एक मुस्लिम लीगच्या नेत्याने अयोध्येतले राम मंदिर आणि धनीपूर मध्ये बांधले जाणारी मशीद हे दोन्ही भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहेत, असे वक्तव्य केले, पण या वक्तव्यापाठोपाठ या नेत्याला काँग्रेसच्या टीकेला सामोरे जावे लागले.Ayodhya temple, mosque both symbols of secularism’: IUML leader faces backlash in Kerala



अयोध्यातले श्रीराम जन्मभूमी मंदिर आणि धनीपूर गावामध्ये बांधले जाणारी मशीद हे दोन्ही भारताच्या धर्मनिरपेक्षतेची प्रतिक्रिया आहेत, असे वक्तव्य केरळ मधल्या इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते सादिक अली शिहाब थंगल यांनी केले. भारतातल्या मुस्लिमांनी राम मंदिराचे अस्तित्व मान्य केले पाहिजे. इतिहासात जे काही घडले ते विसरून भविष्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांनी शांतता आणि सौहार्दाने झाले राहिले पाहिजे, असे सादिक अली थंगल म्हणाले. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या बाकीच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला, पण त्यांचाच मित्रपक्ष असलेला इंडियन नॅशनल लीगच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र सादिक अली दंगल यांच्या वक्तव्याला विरोध केला.

अयोध्यातले राम मंदिर बाबरी मशीद पाडून झाले आहे. कारसेवकांनी बाबरी मशीद शहीद केली नसती, तर तिथे मंदिरच उभे राहू शकले नसते, असे केरळ काँग्रेसचे नेते अलि शाह यांनी सांगितले आणि शाह यांच्या वक्तव्याला इंडियन नॅशनल लीगच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.

हिंदू कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. हा इतिहास मुस्लिम विसरू शकणार नाहीत, तसा त्यांनी विसरता देखील कामा नये, असे चिथावणीखोर वक्तव्य इंडियन नॅशनल लीगच्या नेत्यांनी केले. इंडियन युनियन मुस्लिम लीग इंडियन नॅशनल लीग आणि काँग्रेस हे केरळमध्ये युडीएफचे घटक पक्ष आहेत. या तीन पक्षांमध्येच राम मंदिराच्या मुद्द्यावर परस्पर विरोधी मतांमुळे संघर्ष निर्माण झाला आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगने तात्पुरत्या घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेला काँग्रेस नेत्यांनी देखील विरोध केला आहे.

Ayodhya temple, mosque both symbols of secularism’: IUML leader faces backlash in Kerala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात