वृत्तसंस्था
बिलासपूर : छत्तीसगढ येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र सहाय्यक कमांडंट सुधाकर शिंदे यांना वीरमरण आले आहे.Assistant Commandant Sudhakar Shinde and Assistant Sub Inspector (ASI) Gurmukh lost their lives in the line of duty, during a naxal attack near ITBP Camp Kademeta, in Narayanpur district of Chhattisgarh today.
नारायणपूर जिल्ह्यातील आयटीबीपी कॅम्प कडेमेटाजवळ नक्षलवाद्यांनी घात लावून हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) जवान हुतात्मा झाले . एक एके -47 रायफल, दोन बुलेट प्रूफ जॅकेट आणि एक वायरलेस सेट लुटून नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले, अशी माहिती बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे सुपुत्र सहाय्यक कमांडंट सुधाकर शिंदे आणि सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) गुरुमुख हे हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. आज छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील आयटीबीपी कॅम्प कडेमेटाजवळ झालेल्या नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला चढविला तेव्हा दोघेही कर्तव्यावर होते. या हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App