आदित्य-L1 मोहिमेला आणखी एक यश, इस्रोने उपग्रहाती ‘विंड पार्टिकल’ केला सक्रिय

Aditya L1

  • ISRO ने 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या आदित्य-L1 उपग्रहावरील पेलोड ‘आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट’ कार्य करण्यास सुरुवात झाली आहे आणि ते सामान्यपणे कार्यरत आहे.Another success of Aditya L1 mission ISRO activates Wind Particle on satellite

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी (2 डिसेंबर 2023) ही माहिती दिली. ISRO ने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-L1 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.इस्रोच्या मते, आदित्य-एल1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा आहे. जी पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रेन्जियन पॉइंट ‘एल१’ च्या भोवतालच्या प्रभामंडलातून सूर्याचा अभ्यास करत आहे.

Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ

ISRO ने एका निवेदनात म्हटले आहे की आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) मध्ये सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) आणि सुपरथर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) या दोन अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.

Another success of Aditya L1 mission ISRO activates Wind Particle on satellite

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*