चांद्रयान 3, आदित्य L1 मिशन नंतर भारताचे समुद्रयान मिशन “मत्स्य 6000” समुद्रात 6 किलोमीटर खोलवर पोहोचणार!!


वृत्तसंस्था

चेन्नई : चांद्रयान 3, आदित्य L1 मिशनच्या यशस्वीतेनंतर भारताने विज्ञान क्षेत्रात आणखी मोठी झेप घेतली आहे. भारताचे समुद्रयान मिशन “मत्स्य 6000” समुद्रात 6 किलोमीटर खोलवर पोहोचणार आहे. next isro Samudrayaan mission MATSYA 6000

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रीजिजू यांनी ट्विट करून या संदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे. चेन्नईतील समुद्र विज्ञान संस्थेने हे समुद्रयान तयार केले असून भारतात ब्लू इकॉनोमी अर्थात समुद्र विषयक अर्थव्यवस्था समृद्ध करण्याच्या विशेष अभ्यासासाठी हे समुद्रयान उपयोगी ठरणार आहे. समुद्रात 6 किलोमीटर खोलवर 3 वैज्ञानिकांना घेऊन जाण्याची या समुद्रयनाची क्षमता आहे. म्हणूनच याचे नाव “मत्स्य 6000” असे ठेवले आहे.

समुद्रात 6 किलोमीटर खोलवर 1.6 अंश एवढे थंड तापमान असताना समुद्रयानात मात्र सर्वसाधारण तापमान मेंटेन केले जाईल. समुद्रातल्या जैवविविधतेचा 3 शास्त्रज्ञ अभ्यास करतील आणि विशिष्ट मुदतीत समुद्रयात पुन्हा सुरक्षित परत येईल. या सागरी प्रकल्पाचा सागरी परिसंस्थेला कोणताही त्रास होणार नाही, अशी काळजी समुद्रयान निर्मितीतच घेण्यात आली आहे. याचा किरण रीजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये आवर्जून उल्लेख केला आहे.

भारताला हजारो किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असताना ब्लू इकॉनोमिक अर्थात समुद्र विषयक अर्थव्यवस्था विकसित करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. या ब्लू इकॉनॉमी विकसनासाठी समुद्रयान मोहिमेचा उपयोग होणार आहे.

https://x.com/KirenRijiju/status/1701175948673269772?s=20

यासंदर्भात किरण रीजिजू यांनी केलेले ट्विट असे :

चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी संस्थेने “मत्स्या 6000” समुद्रयान तयार केले आहे. भारताची ही पहिली मानवी महासागर मोहीम आहे. यात “समुद्रयान” खोल समुद्रातील संसाधने आणि जैवविविधता मूल्यांकनाचा अभ्यास करण्यासाठी 3 वैज्ञानिकांना समुद्रात 6 किलोमीटर खोलवर घेऊन जाणार आहे. अर्थात या प्रकल्पामुळे सागरी परिसंस्थेला त्रास होणार नाही. डीप ओशन मिशन या पंतप्रधानांच्या ‘ब्लू इकॉनॉमी’ व्हिजनमधून ही मोहीम साकारत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

next isro Samudrayaan mission MATSYA 6000

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!