लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका, केंद्राने सीबीआयला खटला चालवण्याची दिली परवानगी!


या अगोदर ‘ED’ने जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केलेली आहे.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि  राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. In a major blow to Lalu Prasad Yadav the Center allowed the CBI to prosecute the case

यानंतर सीबीआयने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाला सांगितले की, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध नोकरी घोटाळ्यात नव्या आरोपपत्राला गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

या अगोदर १ ऑगस्ट रोजी  अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ED’ने जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केलेली आहे. ही मालमत्ता लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती, मुलगी हेमा यादव यांचे पती विनित यादव, हेमा यादव यांचे सासरे शिवकुमार यादव यांची आहे.

लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री असताना त्या काळात जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. ही नोकरी गट ड मध्ये देण्यात आली होती.

In a major blow to Lalu Prasad Yadav the Center allowed the CBI to prosecute the case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात