”सनातन धर्माशी लढण्यासाठी I.N.D.I.A आघाडीची स्थापना करण्यात आली” ; – द्रमुक मंत्र्याच्या विधानावर भाजपा आक्रमक!


भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी केली टीका, सोनिय गांधींसह राहुल गांधीनाही विचारला प्रश्न, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  तामिळनाडूचे राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवस अगोदर सनातन धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली. यानंतर द्रमुक नेते ए राजा यांनी सनातन धर्माची तुलना एड्सशी केली. या दोघांनंतर आता द्रमुकचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की  सनातन धर्माशी लढण्यासाठीच I.N.D.I.A आघाडीची निर्मिती झाली आहे. ही व्हिडिओ क्लिप सोमवारी व्हायरल झाली. INDIA Aghadi was formed to fight Sanatan Dharma  Ravi Shankar Prasad

मंगळवारी भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी या व्हिडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देताना  द्रमुकच्या माध्यमातून विरोधी आघाडी I.N.D.I.A. वर टीका केली. ते म्हणाले, “द्रमुकचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांचे वक्तव्य समोर आले आहे. इंग्रजीत ‘द कॅट इज आऊट ऑफ द बॅग’ अशी म्हण आहे. त्यांचा हेतू आता स्पष्ट होऊ झाला आहे. सनातन धर्माला विरोध करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी  I.N.D.I.A आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, “सनातन धर्माला विरोध करून व्होट बँकेचे राजकारण करणे हा विरोधी आघाडीचा अजेंडा आहे. मी काँग्रेस पक्ष आणि या आघाडीला विचारतो. त्यांना इतर कोणत्याही धर्माच्या देवांवर टीका करण्याचा अधिकार आहे का? त्यांच्यात हिंमत आहे का तसे करायची? ते हे करू शकतात का? ते इतर धर्मांबद्दल गप्प राहतात, पण सनातनला उघड विरोध करतात.”

रविशंकर प्रसाद यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पहिला प्रश्न सोनिया गांधींना आहे. भाजपाच्या वतीने सोनिया गांधी यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले असून सविस्तरपणे विचारण्यात आले आहे की, दररोज भारताची संस्कृती, वारसा आणि सनातन धर्माचा अपमान होत असून यावर  सोनिया गांधी गप्प का आहेत? याशिवाय यावर तुम्ही गप्प का आहात, असा सवालही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना देखील विचारण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसशिवाय इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ते पुढे म्हणाले, “द्रमुकपासून ते राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पक्ष अशा काही पक्षांचे विरोधी नेते सनातन धर्म आणि हिंदू धर्माशी संबंधित पवित्र ग्रंथांवर टीका करत आहेत, ते इतर धर्मांवर आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांवर टीका करण्याचा विचार करू शकतात का?”

INDIA Aghadi was formed to fight Sanatan Dharma  Ravi Shankar Prasad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात