विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कृष्णा नदी पाणी वाटपच्या मुद्यावरून आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये निर्माण झालेला वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडविण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. Andhra – Telangana should resolve Krishna water issue
याबाबत आंध्रप्रदेश सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. या याचिकेमध्ये आंध्र सरकारने तेलंगणवर आरोप करताना आमच्या वाट्याला येणारे पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी वळविल्याचे म्हटले होते. यावर सरन्यायाधीश रमणा म्हणाले की, ‘‘ कायदेशीर मार्गाने यावर सुनावणी व्हावी असे मला वाटत नाही.
दोन्ही राज्यांशी माझा संबंध आहे. मध्यस्थीच्या माध्यमातून यावर तोडगा निघत असेल तर त्याबाबत प्रयत्न केले जावेत. आम्ही त्यासाठी मदत करू. अन्यथा मी हे प्रकरण दुसऱ्या पीठाकडे सुपूर्द करेल.’’
सरन्यायाधीशांनी यावेळी दोन्ही राज्यांच्या वकिलांना या प्रकरणी सामंजस्याच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी आपापल्या राज्य सरकारांची मने वळवावीत अशी सूचना करत याप्रकरणात विनाकारण हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नसल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App