जम्मू-काश्मीर : अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद, लष्कराची शोध मोहीम सुरूच!

दहशतवादी लपण्याच्या संशयित ठिकाणावर ग्रेनेड टाकण्यासाठी सैन्याने ड्रोनचा वापर केला

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर  : पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान वारंवार दहशतवादी पाठवत आहे. आज  काश्मीरमधील अनंतनागमध्ये चकमकी दरम्यान भारतीय लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला आहे. आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांची संख्या ४ वर पोहोचली आहे. भारतीय लष्कराचे जवान काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. Jammu and Kashmir Another jawan martyred in Anantnag  terror attack Armys search operation continues

सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग ऑपरेशनमध्ये आणखी एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. हा जवान गुरुवारपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. अनंतनाग भागात दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त सुरक्षा मोहिमेदरम्यान दहशतवादी लपण्याच्या संशयित ठिकाणावर ग्रेनेड टाकण्यासाठी सैन्याने ड्रोनचा वापर केला. परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला लक्ष्य करण्यासाठी सैनिकांकडून ग्रेनेड लाँचरचाही वापर केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी अनंतनागच्या कोकरनाग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट हे शहीद झाले. दरम्यान, लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे. सुरक्षा दलाच्या पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे.

Jammu and Kashmir Another jawan martyred in Anantnag terror attack Armys search operation continues

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात