विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ड्रोन आणि भुयारी मार्गाचा वापर करून देशाविरोधात कारस्थान रचले जात आहे. परंतु देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब दिला जात आहे आणि देऊ, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला.amit shah targets pakistan
शहा म्हणाले, की ज्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, तो देश सुरक्षित आहे. सीमेपलीकडून ड्रोन पाठवण्याचे प्रकार घडत आहेत. भुयारही तयार केले आहेत. परंतु आपण या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहोत. प्रत्येक कटाला प्रत्युत्तर दिले जात आहे आणि भविष्यातही देऊ.
सीमा सुरक्षा दलाचे पथक सीमेवरच्या भुयाराचे आकलन करून त्याचे विश्लेआषण करते. त्या सुरुंगातून आतापर्यंत किती लोकांनी घुसखोरी केली, याचाही छडा सीमा सुरक्षा दलाकडून लावला जातो. सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमांचे संरक्षण करत समर्थपणे संरक्षण करत असल्याने देश लोकशाहीच्या मार्गाने विकासाकडे वाटचाल करत आहे. जवानांचे योगदान आणि हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App