शबरीमलाचे मंदिर पाच दिवसासाठी सुरू. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच दर्शन

विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले असताना शबरीमला मंदिर पाच दिवसांसाठी खुले करण्यात आले. पारंपरिक मासिक विधीसाठी शबरीमला मंदिर सुरू केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हे मंदिर १७ जुलै ते २१ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.shabarimala temple opens

दररोज कमाल ५ हजार लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी मे महिन्यांत त्रावणकोर देवस्थान मंडळाने मंदिराच्या प्रवेशावर बंदी घातली होती. हे देवस्थान पथानमथिट्टा जिल्ह्यातील शबरीमला पर्वतावर असलेल्या भगवान अय्यपा मंदिराचे व्यवस्थापन पाहते. दरम्यान, केरळमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १३ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.बऱ्याच काळानंतर शबरीमला मंदिर सुरू झाल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी रोखण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्यांना किंवा आरटीपीसीआरची निगेटिव्ह चाचणी असणाऱ्या सुमारे ५ हजार भाविकांना दररोज प्रवेश दिला जाईल, असे केरळ सरकारने जाहीर केले आहे. ही चाचणी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर केलेली असावी.

भाविकांना दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवालासह ऑनलाइन बुकिंगची सुविधा मिळणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील दोन्ही डोस घेतलेले किंवा आरटीपीसीआरची निगेटिव्ह चाचणी असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल, असे सांगितले आहे.

shabarimala temple opens

महत्त्वाच्या बातम्या