गुंतवणुक म्हणजे काय ?


गुंतवणुक म्हणजे काय बुवा ? गुंतवणुक म्हणजे आज हातातील पैसा अशा जागी लावणे जो भविष्यात वाढून मिळेल. तुम्ही नोकरी, व्यवसाय अथवा नशिबाने श्रीमंत व्हा. पण जर तुम्ही गुंतवणुक नाही केली तर तुम्ही जास्त काळ श्रीमंत राहू शकणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला काम कराव लागेल. What is an investment?

दोन उदाहरणांवरून हे समजावून घेवू. पहिले उदाहरण, समजा आज सकाळी तुम्हाला जुन्या पॅन्ट मध्ये एक शंभरची नोट सापडली. तुम्हाला आठवल कि अरे ! आपण तर हि नोट आईसक्रिम विकत घ्यायला ठेवली होती. तुम्ही ठरवलं कि आज त्या नोटेने आईसक्रिम विकत घेणार.

तुम्ही दुकानात गेलात, १०० ची नोट दिली आणि आईसक्रिम मागितले. पण तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. कारण मागच्या वर्षी शभरला असलेले आईसक्रिम आता १०६ ला झाले आहे, महागाईमुळे. मग जर तुम्ही तुमचे पैसे अशा जागी नाही लावले जिथे ते १०० चे १०६ होतील तर तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. जेव्हा तुम्ही १०० चे १०६ होण्यासाठी जो प्रयत्न करता त्याला म्हणतात गुंतवणुक. दुसरे उदाहरण, समजा एक शेतकरी आहे, त्याने उत्पादन केलेल्या धान्यापैकी काही धान्य त्याने स्वतःसाठी काढून ठेवले.

आता हे धान्य गुंतवणुक झाली का? जर त्याने ते धान्य पेरणी साठी वापरले तर, हो आणि जर त्याने हे धान्य घरी खाण्यासाठी वापरले तर नाही. जमा करणे म्हणजे झाली बचत, खाणे म्हणजे झाला खर्च आणि पेरणे म्हणजे झाली गुंतवणुक. जर तुमचा पैसा वाढत असेल तरच ती गुंतवणुक आहे. कपाटात पैसे ठेवणे म्हणजे गुंतवणुक नाही हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे महागाईचा दर लक्षात घेवून गुंतवणूक करा. आज गुंतवलेले पेस पुढे किती होतात यालाच खऱ्या अर्थाने महत्व असते.

What is an investment?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय