उत्तर प्रदेशात योगींचीच हवा, ४३.१ टक्के लोकांचा भाजपावरच विश्वास, टाईम्स नाऊ- सी व्होटरचे सर्वेक्षण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीच हवा असल्याचे टाईम्स नाऊ-सी व्होटरच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. राज्यातील ४३.१ टक्के लोकांनी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे.Yogi in Uttar Pradesh, 43.1% believe in BJP, Times Now-C Voter Survey

सत्तेच्या स्पर्धेत असलेल्या समाजवादी पक्षाला केवळ २९.६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मायावतींच्या नेतृत्वात बहुजन समाज पक्षाला १०.१ टक्के मते तर कॉँग्रेसला चौथ्या क्रमांकाची केवळ ८.१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.



४०३ सदस्य असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणार आहे. निवडण्यासाठी घेण्यात येतात. मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी कामगिरी ३१.७ टक्के मतदारांनी खूपच चांगली असल्याचे म्हटले आहे. २३.४ टक्के मतदारांनी कामगिरी साधशरण असल्याचे म्हटले आहे. ३९,५ टक्के लोकांनी कामगिरी खराब असल्याचे मत व्यक्त केले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर आपण संतप्त आहात का आणि हे सरकार बदलावे असे तुम्हाला वाटते का यावर ४८.७ टक्के लोकांनी होय उत्तर दिले आहे. २७.९ टक्के लोकांनी आम्ही योगी सरकारवर आम्हाला राग आहे मात्र हे सरकार बदलावे असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. २३.४ टक्के लोक म्हणतात की ते सरकारवर नाराज नाहीत आणि बदल करण्याची गरज नाही.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वात जास्त योग्य उमेदवार कोण आहे ? असे विचारले असता ४२.२ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्याच नावाला पसंती दिली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ३२.२ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे

मायावती मुख्यमंत्री व्हाव्यात असे केवळ १७ टक्के लोकांना वाटते. केवळ २.९ टक्के लोकांनी कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रीपदी समर्थन दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबद्दल ४४.७ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. १९.७ टक्के लोकांनी त्यांची कामगिरी ससरासरी वाटली आहे. तर ३५.६ टक्के लोकांनी पंतप्रधानांची कामगिरी खराब असल्याचे म्हटले आहे.

Yogi in Uttar Pradesh, 43.1% believe in BJP, Times Now-C Voter Survey

महत्त्वाच्या बातम्या