विहिरीचा कठडा ढासळून झालेल्या विचित्र दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील विदिशा येथे मुलाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू असताना विहिरीचा कठडा ढासळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. यावेळी १९ जणांना वाचविण्यात यश आले.गंज बसोडा भागात लाल पाटर येथे ५० फूट खोल विहिरीत रवी नावाचा लहान मुलगा पडला. या विहिरीत वीस फूट पाणी होते.11 peopels died in MP

या घटनेची माहिती कळताच गावकरी विहिरीजवळ जमले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. विहिरीभोवती असलेल्या कठड्यावर गावकरी उभा राहिले. मुलाला वाचवण्यासाठी गावकरी मदत करत असतानाच विहिरीचा हा कठडा कोसळला.त्यानंतर एकामागून एक विहिरीत पडले. तब्बल चोवीस तासाच्या प्रयत्नानंतर ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि १९ जणांना वाचविण्यात आले. सर्वात शेवटी रवीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

11 peopels died in MP

विशेष प्रतिनिधी