स्वामींच्या मृत्यूवरू भारताने ‘यूएन’च्या अधिकाऱ्यास फटकारले

विशेष प्रतिनिधी

जीनिव्हा : कोठडीत असताना फादर स्टॅ न स्वामी यांचा झालेल्या मृत्यूची भारतामधील मानवी हक्कांच्या घटनांवरील डाग असून तो कायम लक्षात राहील, असे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मानवी अधिकार तज्ज्ञ मेरी लॉलोर यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्वामी यांचे प्रकरण हाताळण्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोप भारताने फेटाळले आहेत.India attack on UN

‘संबंधित अधिकाऱ्यांची कृती ही कायद्याचे उल्लंघन करणारी असून कायदेशीर अधिकारांमध्ये ते अडथळे आणू शकत नाहीत,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले आहे. भारतातील सर्व नागरिकांचे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आमचा देश कटिबद्ध आहे. देशातील लोकशाही पद्धती ही स्वतंत्र न्यायमंडळ आणि राष्ट्रीय न राज्य पातळीवरील मानवी हक्क आयोगाशी एकरूप आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.एल्गार परिषद प्रकरणात स्टॅन स्वामी यांना बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे ५ जुलै रोजी निधन झाले. ‘लॉलोर म्हणाल्या की, फादर स्वामी यांच्या या घटनेने

मानवी हक्कांचे रक्षणकर्ते आणि कायद्यांच्या पुरेशा आधाराविना कोठडीत डांबलेल्यांची सुटका करायला हवी, याची आठवण सर्व देशांना पुन्हा करून दिली आहे. कॅथॉलिक धर्मोपदेशक आणि मानवी हक्क व सामाजिक न्यायासाठी चार दशकांपासून लढणाऱ्या स्टॅन स्वामी यांचा मृत्यू हा भारतातील मानवी हक्कांच्या घटनांवरील डाग आहे.

India attack on UN

महत्त्वाच्या बातम्या