468 स्टेशन्सची न्यूयार्क सिटी सबवे

प्रगतीशील अमेरिकेतील अनेक बाबी थक्क करणाऱ्याच आहेत. न्यूयार्क शहराची धमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीगत रेल्वेचे विशाल जाळे जर आपण पाहिले तर आवाकच होवून जातो. न्यूयार्क सिटी सबवे म्हणून ओळखली जाणारी हे रेल्वेसेवा 1868 मद्येच सुरु जाली. New York City subway of 468 stations

बहुताश भागात जमीनीखालून जाणारी ही रेल्वे काही ठिकाणी मात्र जमिनीवरुनही प्रवास करते. जगातील ही सर्वात मोठी रॅपिड ट्रांझिट सेवा आहे. म्हणजे केवळ एका शहरासाठी तयार केलेली ही सर्वात मोटी ररेल्वे सेवा आहे. तसेच जगातील सर्वात जुनी सार्वजनिक वाहूत सेवादेखील आहे.

वर्षातील 365 दिवस आणि 24 तास ही रेल्वे धावत असते. न्यूयार्क सिटी सबवेमध्ये चक्क 468 स्टेशन्स आहेत. जादा स्टेशन्सचा विक्रम शिरपेचात घेवून धावणाऱ्या या रेल्वेसेवकडे जगातील सर्वांत लांब सबवेचादेखील मान जातो. ही सेवा 373 किलोमीटर लांब आहे. म्हणजेच साऱ्या न्यूयार्क शहरात मिळून एतक्या लांबीच्या रुळावर ती धावते. त्यामुळे या रेल्वेसेवेला या शहराची धमनी असेच संबोधले जाते. मुंबईत जशी लोकल आहे तशीच ही न्यूयार्कची सेवा आहे.

मात्र फरक इतकाच की सेवा भूमीगत आहे. आपल्याकडे दिल्लीमध्ये जशी मेट्रो सेवा आहे तशीछ ही रेल्वे सेवा आहे. मात्र दिल्लीतील मेट्रोचा मार्ग शंभर किलोमीटरपेक्षाही कमी आहे. यावरुन या सबवेचे महत्व व पसारा लक्षात येतो. गेल्या वर्षी या सेवेचा तब्बल 175 कोटी प्रवाशांनी लाभ घेतला. म्हणजेच दररोज सरासरी 56 लाख लोक या रेल्वेतून प्रवास करतात.

अशा प्रकारे अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेली ही सेवा अविरत सुरुच असून त्याच्यामध्ये दररोज नवनव्या आधुनिक साधनांची, सोयीसुविधाची भर पडत आहे. जगातील अनेक विकसित देशांतील सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी आदर्शवत असणारी ही सेवा आहे.

New York City subway of 468 stations