CJP आंदोलन : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा घेण्याच्या अलिकडच्या सगळ्या गोष्टी मोदी सरकार कडून पूर्ण!!; कोणत्या त्या वाचा!!

नाशिक : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि सोनम वांगचूपचे उपोषण यामुळे विशिष्ट दबाव वाढल्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचा अलीकडच्या सगळ्या गोष्टी काल मध्यरात्री आणि आज पूर्ण केल्या. Modi government

फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन

मोदी सरकारने नीट पेपर फुटीचा खटला चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली, तसे कोर्ट लगेच स्थापन केले. त्याच्या न्यायाधीश पदी अनु बालिगा यांची नियुक्ती सुद्धा केली.

मोदींचा व्हिडिओ संदेश

त्या पाठोपाठ स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून संदेश देऊन पेपर लीगच्या विरोधात कठोरातला कठोर कायदा करण्याची सुद्धा घोषणा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन थांबविण्याचे आवाहन करतानाच सरकारने केलेल्या सर्व उपाययोजनांची काल रात्रीच जाहीर माहिती दिली. मोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी वाद घालण्यापेक्षा थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणे पसंत केले.

केंद्रीय शिक्षण सचिवांची बदली

त्यापूर्वीच काल सायंकाळी मोदी सरकारने केंद्रीय शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांच्या जागी नरेश पाल गंगावार यांची शिक्षण सचिव पदी नियुक्ती केली. मोदी सरकारने प्रशासकीय पातळीवरच्या सर्व हालचाली पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठा सकारात्मक संदेश दिला.

सोनम वांगचूकचे उपोषण मागे

त्यामुळेच सोनम वांगचुक याने केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते पेय प्राशन करून उपोषण सोडले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येण्याच्या आधीच आपण का उपोषण सोडले??, याचा खुलासा सुद्धा सोनम वांगचुकने केला. सरकार विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसून आले. त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही, तर त्यातून सरकारचेच नुकसान आहे, असा इशारा द्यायला सुद्धा सोनम वांगचुक विसरले नाहीत.

 विद्यार्थ्यांशी कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये चर्चा

त्याचबरोबर सरकारने विद्यार्थ्यांची चर्चेची मागणी मान्य केली ही चर्चा जंतर-मंतरवर होणार नसून ती कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये होईल हे सरकारचे म्हणणे विद्यार्थ्यांनी मान्य केले म्हणजेच संबंधित चर्चा जगत प्रकाश नड्डा यांच्या घरी न होता ती त्रयस्थ ठिकाणी होईल याचा अर्थ सरकार आणि विद्यार्थी या दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल मागे घेतले धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्याच्या अलीकडची सगळी पावले सरकारने आणि विद्यार्थ्यांनी टाकून जंतर-मंतर लवकर मोकळा करण्याचा मार्ग सुकर करून ठेवला.

All recent moves regarding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan have been completed by the Modi government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात