अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे तब्बल 100000 लोकांना रोजगार; रेल्वे मंत्र्यांकडून सुरत मध्ये कामाची पाहणी!!


वृत्तसंस्था

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन पुणे ट्रेन प्रकल्पांमध्ये तब्बल 100000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली आहे. Ahmedabad – Mumbai bullet train project employs over 100,000 people

अश्विन वैष्णव यांनी गुजरातच्या सुरत मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. गुजरात मध्ये सुमारे 80 % आणि महाराष्ट्रात 20 % असे या प्रकल्पाचे स्वरूप असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला बुलेट ट्रेनचा हा भारतातला पहिला प्रकल्प आहे. जपानने त्याला अर्थसाह्य आणि तंत्रसाह्य दिले आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरात मधले काम वेगाने सुरू असून प्रकल्पासाठी 80 % जमिनीचे संपादन आणि प्रत्यक्ष काम होत आले आहे. महाराष्ट्रात जमीन संपादनात काही अडचणी येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या राजकारणाचाही संबंध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पामध्ये स्वतःहून रस घेतल्याने महाराष्ट्रात त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 महिन्यांपूर्वी ज्या केंद्रीय प्रकल्पांचा आढावा घेतला होता, त्यामध्ये बुलेट ट्रेनचा प्रामुख्याने समावेश होता. त्यावेळी पंतप्रधान रेल्वे खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कामाला वेग देण्याची सूचना दिली होती. त्यानंतर प्रथमच स्वतः रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सुरत मध्ये येऊन या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सूरत – बिलिमोरा लाईनचे काम 2026 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Ahmedabad – Mumbai bullet train project employs over 100,000 people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात