पंजाब मध्ये ख्रिश्चन धर्मांतराविरुद्ध आवाज बुलंद; अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांचा शीख समुदायाला इशारा


वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाब मध्ये ख्रिश्चन धर्मांतराविरुद्ध एक मोठा आवाज उठला आहे. सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी हरपित सिंग यांनी हा इशारा दिला आहे. पंजाब मध्ये शीख समुदाय सध्या खूप अडचणींचा सामना करतो आहे. कारण त्याला धार्मिक दृष्ट्या कमकुवत करण्यात येत आहे. शीख समुदाय धार्मिक दृष्ट्या कमकुवत झाला की तो सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्याही कमकुवत होईल, असा ख्रिश्चन धर्मांतर करणाऱ्यांचा होरा आहे. पंजाब मधल्या गावांना गावांमध्ये ख्रिश्चन धर्मांतरे घडवली जात आहेत. ख्रिश्चॅनिटी व्यापक प्रमाणात पसरवली जात आहे. शीख समुदायाने त्यापासून सावध राहावे, असा इशारा हरप्रीत सिंह यांनी दिला आहे. Sikhs are facing a lot of difficulties that are making us weak religiously, socially & economically.

ख्रिश्चन धर्मांतराचा धोका प्रामुख्याने पंजाब मधल्या पाकिस्तान बॉर्डर वर असलेल्या गावांमध्ये जास्त आढळून येतो, असे निरीक्षण ज्ञानी हरप्रीत सिंग नोंदवले आहे. शीख समुदाय धार्मिकदृष्ट्या बळकट राहिला नाही, सामाजिक आणि आर्थिक ताकद त्याने टिकवली नाही, तर पंजाब मध्ये शीख समुदाय राजकीय दृष्ट्या कमकुवत व्हायला आणि संपुष्टात यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही यांनी हरप्रीत सिंह यांनी दिला आहे.

– आम आदमी पार्टीच्या विजयाचा धोका

पंजाब मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, अकाली दल या तिन्ही पक्षांना पराभूत करून आम आदमी पार्टी सत्तेवर आली. सत्ता आल्यानंतर दोन तीन महिन्यांमध्ये पंजाब मध्ये खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी डोके वर काढले आहे. ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशी आजच सुवर्ण मंदिरासमोर शेकडो खलिस्तानी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून भिंद्रानवाले यांची पोस्टर्स फडकवली आहेत. या पार्श्वभूमीवर अकाल तख्त सेजल केदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी दिलेला इशारा अधिक गंभीर ठरतो आहे.

Sikhs are facing a lot of difficulties that are making us weak religiously, socially & economically.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात