Womens Reservation Bill : प्रदीर्घ चर्चेनंतर महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोनतृतीयांश बहुमताने मंजूर

जाणून घ्या, समर्थनात आणि विरोधात किती मतं पडली?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) प्रदीर्घ चर्चेनंतर बुधवारी लोकसभेत एक तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या समर्थनार्थ 454 तर विरोधात 2 मते पडली. After a long debate the Womens Reservation Bill was passed in the Lok Sabha with a two thirds majority

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चिठ्ठीद्वारे मतदान करून  घेतले. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. तेथून पास झाल्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

महिला आरक्षण विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केले जाईल. लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. हे आरक्षण 15 वर्षे टिकेल. यानंतर संसदेची इच्छा असल्यास ती मुदत वाढवू शकते. हे आरक्षण थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लागू असेल. म्हणजेच ते राज्यसभा आणि राज्यांच्या विधानपरिषदांना लागू होणार नाही.

After a long debate the Womens Reservation Bill was passed in the Lok Sabha with a two thirds majority

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात