मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारेही ‘कनेक्ट’


 ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनलचा ‘श्री गणेशा’, जाणून घ्या कसं कनेक्ट व्हायचं

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ हे  जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सभा, दौरे, बैठका, रॅली, पत्रकारपरिषदा याचबरोबर ट्वीटर हॅण्डलर आणि फेसबुक पेज आदी माध्यमांचा  वापर करताना आपणास आतापर्यंत  दिसले. मात्र आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली असून, मुख्यमंत्री शिंदे आता जनतेशी व्हॉटसॲपद्वारेही ‘कनेक्ट’  झाले आहेत. Chief Minister Eknath Shinde now connects with the people directly through WhatsApp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले असून गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनलचा ‘श्री गणेशा’ करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

प्रमाणित असलेल्या या चॅनलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी त्याला फॉलो केले आहे. whatsapp.com/channel/0029Va या वर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘CMO Maharashtra’ चॅनलला फॉलो करता येणार आहे.

Chief Minister Eknath Shinde now connects with the people directly through WhatsApp

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात