आफ्रिकन युनियन बनले ‘G20’चे सदस्य, मोदींनी अध्यक्षांना मिठी मारून केले स्वागत


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशीचे पहिले सत्र सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले आणि मोदींनी सर्वप्रथम मोरोक्कोच्या भूकंपाबद्दल शोक भावना व्यक्त केली, जिथे सुमारे 300 लोक मरण पावले आहेत. या दु:खाच्या काळात संपूर्ण जग मोरोक्कोसोबत असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर आफ्रिकन युनियनच्या G20 गटात अधिकृतपणे सामील झाल्याची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली आणि युनियन अध्यक्षांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. African Union becomes member of G20 Modi welcomes president with hug

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की, तुमच्या सर्वांच्या संमतीने आफ्रिकन युनियन आजपासून G20 चा स्थायी सदस्य होणार आहे. या घोषणेनंतर सर्व नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असुमानी यांना सोबत आणले आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना मिठी मारली आणि याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदींनंतर सर्व जागतिक नेते एक एक करून आपली मते मांडत आहेत. मोरोक्कोच्या भूकंपावर पंतप्रधान म्हणाले की G20 ची कार्यवाही सुरू करण्यापूर्वी, मी मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त करू इच्छितो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”

याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेतील गोंधळ असो, उत्तर-दक्षिण विभागणी असो, पूर्व-पश्चिम विभागणी असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा आणि जलसुरक्षा असो… येणाऱ्या काळात या आव्हानांना ठोस उपायांसह सामोरे जावे लागेल, असे पंतप्रधान म्हणाले.

African Union becomes member of G20 Modi welcomes president with hug

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात