विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात पूर्वीच अटक केलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीनावर सोडून दिले. त्यामुळे INDI आघाडीच्या नेत्यांना आनंदाचा पारावर उरला नाही. सगळे नेते सुप्रीम कोर्टावर खुश झाले. सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन केले. पण कालपर्यंत जे केंद्रीय तपास संस्थांना आणि थेट सुप्रीम कोर्टालाही शिव्या घालत होते. ते सगळे नेते आज केवळ एका जामीन अर्ज मंजुरीमुळे खुश झाल्याने मोदी सरकारच्याच जाळ्यात अडकले.Aam Aadmi Party MP Sanjay Singh; INDI Alliance leader happy with Supreme Court!!; Govt’s challenge to the opposition
संजय सिंह यांच्या जामीन अर्जाला ED ने विरोध केला नाही सुप्रीम कोर्टाने मागितलेली काही डॉक्युमेंट्स ED कोर्टात हजर करू शकले नाही. त्यामुळे कोर्टाने संजय सिंह यांना जामीनावर सोडण्याचे आदेश दिले. संजय सिंग यांना जामीन मिळाल्याबद्दल समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी आनंद व्यक्त केला. संजय सिंह यांच्या घरी सेलिब्रेशन झाले.
#WATCH | Celebration begins outside the residence of AAP MP Sanjay Singhin Delhi after the Supreme Court granted him bail. pic.twitter.com/BV87n2L8Z2 — ANI (@ANI) April 2, 2024
#WATCH | Celebration begins outside the residence of AAP MP Sanjay Singhin Delhi after the Supreme Court granted him bail. pic.twitter.com/BV87n2L8Z2
— ANI (@ANI) April 2, 2024
INDI आघाडीच्या सर्व नेत्यांनी सुप्रीम कोर्टावर विश्वास व्यक्त केला. सुप्रीम कोर्टामुळे देशातील लोकशाही टिकून आहे. जसा संजय सिंह यांना न्याय मिळाला, तसा अरविंद केजरीवालांनाही सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली. सगळ्यांनी सुप्रीम कोर्टावर विश्वास व्यक्त केला. हे तेच नेते आहेत, जे केंद्रीय तपास संस्था आणि सुप्रीम कोर्टावर मोदी सरकारच्या हातातले बाहुले बनल्याचा आरोप करत होते.
विरोधकांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केल्याबरोबर लगेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुप्रीम कोर्ट स्वतंत्रपणेच निर्णय घेतात. त्यांच्यावर कुठलाही सरकारचा दबाव काम करत नाही हे आम्ही आधीपासून सांगत होतो, पण आज ते विरोधकांना पटले, असा टोमणा हरदीप सिंह पुरी यांनी सगळ्या विरोधकांना हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App