इस्रायलने ‘अल-जझीरा’ला दिला झटका, ‘दहशतवादी चॅनल’ म्हणत प्रसारणावर घातली बंदी!

जाणून घ्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नेमकं काय म्हटलं आहे?


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अल-जझिरा या वृत्तवाहिनीला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, इस्रायलने अल-जरीरा या वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही माहिती दिली आहे.Israel struck Al Jazeera calling it a terrorist channel and banned it from broadcasting

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये त्यांनी अल-जझीराच्या प्रसारणावर बंदी घातल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी अल-जरीराला ‘दहशतवादी चॅनल’ असेही संबोधले आहे.



इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अल जझीराने इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवली. 7 ऑक्टोबरच्या हत्याकांडात सक्रिय सहभाग घेतला. आता ती आपल्या देशातून काढून टाकण्याची वेळ आली आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, ‘दहशतवादी वाहिनी अल-जझीरा आता इस्रायलमधून प्रसारित होणार नाही. चॅनलचे प्रसारण थांबवण्यासाठी नवीन कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याचा माझा मानस आहे. त्यांनी लिहिले की, ‘मी कम्युनिकेशन मंत्री श्लोमो कराई यांनी केलेल्या कायद्याचे स्वागत करतो.

Israel struck Al Jazeera calling it a terrorist channel and banned it from broadcasting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात