वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बोर्डिंगनंतर फ्लाइटला बराच विलंब झाल्यास प्रवाशांना विमानात बसून जास्त वेळ थांबावे लागणार नाही. ते फ्लाइटमधून उतरू शकतात. एअरलाइन्स कंपन्यांना आता त्यांच्या प्रवाशांना विमानतळाच्या एक्झिट गेट किंवा डिपार्चर गेटमधून बाहेर काढण्याची मुभा असेल.New Guidelines for Airlines; If the flight is delayed, passengers can exit, no need to wait for hours
ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS), विमान वाहतूक सुरक्षेची देखरेख करणाऱ्या संस्थेने 30 मार्च रोजी एक गाइडलाईन जारी केली होती, जी आता लागू झाली आहे.
भारतातील विमानतळांवर, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विमाने टेक-ऑफ करतात. जेव्हा प्रवाशांना बसवल्यानंतर त्यांचे दरवाजे बंद केले जातात, तेव्हाच विमान टेक-ऑफसाठी रांगेत उभे राहू शकतात. जर कोणतेही विमान गेटवर परत आले, तर त्याला रांगेतून काढून टाकले जाते.
दाट धुके असलेल्या दिवसात, जेव्हा विमाने वेळेवर टेक ऑफ करू शकत नाहीत, तेव्हा रांग 100 पर्यंत पोहोचते. यामुळे प्रवाशांना बराच वेळ म्हणजे काहीवेळा फ्लाइटमध्येच 2 ते 5 तास थांबावे लागते.
प्रवाशांना विमानातून उतरवल्यास, ते आगमन टर्मिनलमधून बाहेर पडतील, परंतु परत जाण्यासाठी, त्यांना पुन्हा संपूर्ण सुरक्षा तपासणी करावी लागते. या प्रक्रियेस बराच वेळ लागतो.
हा निर्णय का घेतला गेला?
गेल्या काही महिन्यांत विमान विलंबामुळे दोन मोठ्या घटना घडल्या. जानेवारीत, मुंबई विमानतळावर विमानात बसणारे प्रवासी विलंबामुळे संतप्त झाले होते. ते फ्लाइटमधून उतरले आणि रनवेवर बसले. प्रवाशांनी जमिनीवर बसून जेवण केले.
जानेवारीतील आणखी एका घटनेत, गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटचा (6E-2175) प्रवासी नाराज झाला आणि त्याने पायलटला थप्पड मारली. हे विमान सकाळी 7.40 वाजता उड्डाण करणार होते, मात्र धुक्यामुळे काही तास उशीर झाला. या दोन्ही घटनांनंतर बीसीएएसने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
नवीन नियम काय ?
आता प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. विमानात बसल्यानंतर त्यांना तास न् तास बसावे लागणार नाही. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर लक्षणीय उशीर झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना विमानतळाच्या निर्गमन गेटमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल.
BCAS महासंचालक झुल्फिकार हसन म्हणाले, ‘विमानतळ चालकांना मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी स्क्रीनिंग तसेच मूलभूत पायाभूत सुविधांची व्यवस्था करावी लागेल. विमान कंपनी आणि त्याच्याशी संबंधित सुरक्षा एजन्सी प्रवाशांना विमानातून उतरवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
प्रवाशांना विमान सोडण्यास किती उशीर केला जाईल, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्रवाशांना फ्लाइटमधून उतरवण्याचा निर्णय एअरलाइन आणि त्याच्याशी संबंधित सुरक्षा एजन्सी घेतील एवढेच सांगण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App