विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सोमवारी व्हर्च्युअली बैठक होणार असून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही व्हर्च्युअल बैठक महत्त्वाची मानली जात आहे.A meeting between Prime Minister Modi and US President Joe Biden will be held
अमेरिका आणि भारत यांच्यातील 2 प्लस 2 चर्चा देखील पुढील आठवड्यात सुरू होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमधील ही बाचचित अशा वेळी होत आहे जेव्हा भारतावर रशियाकडून तेल खरेदीचा विचार न करण्याचा दबाव आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकायार्चा आढावा घेतील आणि दक्षिण आशिया आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सध्याच्या घडामोडींवर विचार विनिमय करतील, असे शासकीय निवेदनात म्हटले आहे.
गेल्या दीड महिन्यात अनेक देशांचे उच्चस्तरीय नेते भारतात आले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, त्यांच्या मुली, त्यांच्या संपूर्ण देशावर आर्थिक निर्बंध असताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह भारतात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेण्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.
त्याचवेळी अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनीही नवी दिल्लीला भेट देऊन रशियाकडून तेल खरेदीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे स्पष्ट केले आहे की, तेलाच्या किमतींमध्ये जागतिक किंमत आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यांच्या दरम्यान भारत आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more