बंधुभावाचा संदेश, हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्रिपणे केले कुराण व हनुमान चालिसाचे पठण


विशेष प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्र येत कुराण व हनुमान चालिसाचे एकाच कार्यक्रमात पठण केले. या द्वारे या रिक्षा चालकांनी हिंदू-मुस्लिम एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.
देशभरात पवित्र रमजान आणि राम नवमी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे.Brotherhood message, Hindu and Muslim rickshaw pullers recite Quran and Hanuman Chalisa together

काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात भाषण केलं होते. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पडायला सुरुवात झाली. मात्र, असे असताना पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांनी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी कुराण आणि हनुमान चालिसाचे पठण करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.



सध्या मुस्लिम धमीर्यांचा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रविवारी राम नवमीचा दिवस होता. दोन्ही धर्मांतील सणाचं पावित्र्य आणि आदर राखत काल रविवारी हिंदू व मुस्लिम बांधवांनी हनुमान चालीसा आणि कुराण मधील सुराह अल फतेह या आयतींचे एकत्र पठण केले. हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यांवरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने रिक्षाचालकांनी केलेल्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Brotherhood message, Hindu and Muslim rickshaw pullers recite Quran and Hanuman Chalisa together

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात