बांगलादेशी खासदाराच्या हत्येसाठी दिली होती तब्बल 5 कोटींची सुपारी!

सीआयडीचा दावा; 12 मे रोजी कोलकात्यात आले होते


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. बंगाल सीआयडीने सांगितले की, खासदार अनार यांच्या मित्राने हत्येसाठी सुमारे 5 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमन खान यांनी बुधवारी सांगितले की, अनार १३ मेपासून बेपत्ता होते. ते कोलकात्यात होते. तीन जणांना अटक करण्यात आली आहे.A contract worth 5 crores was given for the murder of a Bangladeshi MP



सीआयडीचे आयजी अखिलेश चतुर्वेदी म्हणाले की, ही नियोजित हत्या होती. खासदाराच्या एका जुन्या मित्राने त्याला मारण्याचे कंत्राट दिले होते. सुमारे पाच कोटी रुपयांची सुपारी होती. त्याचा मित्र अमेरिकन नागरिक असून त्याचा कोलकात्यात फ्लॅट आहे. एक दिवसापूर्वी त्यांनी सांगितले होते की, परदेशी खासदाराचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. ‘फ्लॅटमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत का?’ या प्रश्नावर सीआयडी अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची चौकशी करत आहे. याबद्दल बोलणे खूप घाईचे आहे.

बांगलादेशी खासदार उपचारासाठी कोलकाता येथे आले होते. डेप्युटी हाय कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खासदार अझीम 12 मे रोजी कोलकाता येथे पोहोचले होते आणि ते शहराच्या उत्तर भागातील बारानगर येथे त्यांच्या मित्राच्या घरी थांबले होते. 13 मे रोजी तो कोणालातरी भेटायला गेले होता पण परत आलेच नाही. हे प्रकरण 18 मे रोजी उघडकीस आले, जेव्हा बांगलादेशी खासदार बेपत्ता झाल्याची माहिती गोपाल बिस्वास या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात दिली. अनार कोलकाता येथे बिस्वास यांच्या घरी थांबले होता. 17 मे पासून खासदार आपल्या संपर्कात नसल्याचा दावा बिस्वास यांनी केला. त्यामुळे त्यांनी एका दिवसानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ते नवी दिल्लीला रवाना झाल्याचा संदेश त्याच्या फोनवरून कुटुंबीयांना पाठवण्यात आला होता.

A contract worth 5 crores was given for the murder of a Bangladeshi MP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात