8 दिवसांपासून बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा मृतदेह कोलकात्यात आढळला; पोलिसांना हत्येचा संशय, 3 जणांना अटक

वृत्तसंस्था

कोलकाता : भारतात 8 दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार बुधवारी (22 मे) कोलकाता येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी कोलकाता पोलिसांच्या हवाल्याने याला दुजोरा दिला आहे.Body of Bangladeshi MP missing for 8 days found in Kolkata; Police suspect murder, arrest 3 people

कोलकाता पोलिसांनी सांगितले की, न्यू टाऊन परिसरात खासदार अन्वारुल यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. याला पूर्वनियोजित हत्या असेही म्हटले आहे.



खासदार अन्वारुल उपचारासाठी कोलकाता येथे आले होते

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, खासदार अन्वारुल 12 मे रोजी उपचारासाठी कोलकाता येथे आले होते. दुसऱ्याच दिवशी ते बेपत्ता झाले. अझीम यांचा फोनही 13 मेपासून बंद होता.

यानंतर 17 मे रोजी बिहारमधील काही भागात त्यांचा फोन काही काळासाठी बंद झाला होता. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांच्या फोनवरून त्याच्या कुटुंबीयांना संदेश पाठवण्यात आला की ते नवी दिल्लीला निघून गेले आहे.

बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार कोण होते?

अन्वारुल अझीम अनार हे पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी 2014, 2018 आणि 2024 मध्ये झेनैदह-4 मतदारसंघातून निवडणूक जिंकली. अझीम यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी शेख हसीना यांची भेट घेऊन मदत मागितली होती.

मित्राच्या घराची झडती सुरू, पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वारुल 12 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे कौटुंबिक मित्र गोपाल बिस्वास यांना त्यांच्या कोलकाता येथील घरी भेटण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.41 वाजता डॉक्टरांना भेटण्याचे सांगून ते तेथून निघून गेले.

संध्याकाळी परत येईल असे सांगितले. अन्वारुल यांनी बिधान पार्कमधील कलकत्ता पब्लिक स्कूलसमोरून टॅक्सी पकडली. संध्याकाळी त्यांनी गोपाल यांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवून आपण दिल्लीला जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांचे ठिकाण मिळू शकले नाही.

Body of Bangladeshi MP missing for 8 days found in Kolkata; Police suspect murder, arrest 3 people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात