विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पाटीर्चे नेते आणि 49 वर्षीय खासदार आमिर लियाकत हुसैन यांनी 18 वर्षाच्या मुलीशी लग्न केले आहे. आमिर लियाकत हुसैन यांचं हे तिसरं लग्न आहे.49 Pakistani MPs marry 18-year-old girl
आमिर लियाकत हुसैन यांनी ट्विटवर सैयदा दानिया शाह हिच्याशी लग्न केल्याची माहिती दिली आहे. आमिर हुसैन यांची दुसरी पत्नी सैयदा तूबा अनवर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून तलाक संदर्भात माहिती दिली होती. आमिर लियाकत हुसैन एक ट्विट करुन लग्नाबद्दल माहिती दिली होती. दक्षिण पंजाबच्या लोधरानमधील सदाआत कुटुंबातील सैयदा दानिया शाह हिच्याशी निकाह केला असून तिचं वय 18 वर्ष आहे.
लियाकत हुसैन यांनी चाहत्यांनी शुभेच्छा द्याव्यात असं म्हटलंय. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद उफाळून आला असून चर्चांना सुरुवात झालीय. दुसºया पत्नीला तलाक दिल्याच्या दुसऱ्या दिवशी आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरा निकाह केला.
आमिर लियाकत हुसैन यांच्याशी लग्न झाल्यानंतर सैयदा दानिया शाह हिने माध्यमांशी संवाद साधला. आमिर लियाकत हुसैन हे लहानपणापासून आदर्श असल्याचं म्हटलं आहे. लहानपणी ज्यावेळी रडत असे त्यावेळी माझे आई वडिल टीव्हीवर आमिर लियाकत हुसैन यांचा फोटो दाखवत असल्याची सैयदा हुसैन हिनं सांगितलं.
आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरा निकाह केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्याºया मीम्सचा पाऊस सोशल मीडियावर पडला. फेब्रुवारी या ट्विट अकाऊंटवरुन आमिर हुसैन यांचा एक फोटो ट्विट कत आमिर लियाकत हुसैन यांनी 18 वषार्पूर्वी त्यांच्या पत्नीला हातात घेतल्याचं म्हटलंय. आमिर लियाकत हुसैन आणि सैयदा दानिया शाह यांच्या वयातील अंतरावरुन टीका करणारी अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App