वृत्तसंस्था
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. सांगलीच्या एसपींनी सांगितले की, हे चारही साधू यूपीचे रहिवासी असून ते पंढरपूरला दर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांनी त्यांना मूलं चोरणारे समजून मारहाण केली.4 sadhus were brutally beaten by a mob in Sangli on the suspicion that they were child thieves
सांगलीचे एसपी दीक्षित कुमार गेडाम म्हणाले की, हे साधू विजापूरहून पंढरपूरला जात असताना लवंगे गावात काही लोकांनी त्यांना मारहाण केली. मात्र, माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी साधूंवर उपचार केले.
लोकांनी साधूंना मारहाण केल्याचे पोलिस सांगत असून स्थानिक उमदी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र तक्रार न घेता ते निघून गेले आणि लेखी तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना ना अटक केली ना त्यांच्यावर कारवाई केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याच्या एसपींनीही खुलासा देऊन चौकशी करू, असे सांगितले आहे.
स्थानिक लोक काय म्हणतात?
विविध माध्यमांतील वृत्तानुसार, वाटेत स्थानिक लोकांशी बोलत असताना एकमेकांची भाषा न समजल्यामुळे प्रकरण आणखी चिघळले आणि स्थानिक लोकांनी साधूंना बेदम मारहाण केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील साधूंवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात 2 साधूंना जमावाने याच कारणासाठी बेदम मारहाण केली होती. ते साधू कारमध्ये बसून सुरतमध्ये अंत्यसंस्कारासाठी जात होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App