माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विधानसभेत अश्रू अनावर!!


प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेत आपल्या कारकिर्दीच्या सगळ्या कहाण्या सांगताना एका कहाणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते खूप भावनाशील झाले. एकनाथ शिंदे यांचा दोन मुलांचा अल्पवयात मृत्यू झाला. त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांचे फक्त सांत्वन केले नाही, तर त्यांना खूप मोलाचा धीर दिला. ही आठवण सांगताना एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय जीवनाचा संपूर्ण आढावा या भाषणात घेतला. Eknath shinde became emotional while remembering his deceased children– एकनाथ शिंदे म्हणाले :

श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला. माझ्या आयुष्यात दुखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या समोर गेली. त्यावेळेस मला आधार दिला, आनंद दिघे साहेबांनी आधार दिला.

  •  महाराष्ट्राने अनेक घटना पाहिल्या असतील, खासदार, आमदार किंवा नगरसेवक असतील तर ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. पण, पहिल्यांदाच अशी घटनेची नोंद फडणवीस यांनी सांगितले की, 33 देशांनी नोंद घेतली आहे.
  •  स्वतःचं आमदार, मंत्रिपद डावावर लावून सगळे जण हे आमच्यासोबत आले, समोर एवढे मोठे मंत्री, नेते, सत्ता आणि यंत्रणा होती. पण, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा सैनिक होता. आम्ही ज्या दिवशी विधानभवनातून निघालो तो आधी मी व्यथित होतो. ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागले होते, त्याची साक्षीदार इथं बसलेले आमदार होते.
  •  बाळासाहेबांनी नेहमी आमदारांविरोधात बंड पुकारण्याचे सांगितले. मला त्यावेळी काय झालं काही कळत नव्हतं. मी लोकांना फोन लावले आणि मोहिम सुरू केली. मला मुख्यमंत्र्यांनी फोन करून विचारलं, कुठे चाललाय, कशाला चाललाय आणि कधी येणार, असं विचारलं मी सांगितलं कधी येणार हे सांगितलं नाही.
  •  अजितदादा हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहिद झालो तरी चालेल पण मागे येणार नाही, असं ठरवलं होतं. मी आमदारांना विश्वास दिला होता, तुमची आमदारकी, तुमचे भवितव्य काय असेल हे यासाठी मी लढेन, जोपर्यंत तुमचं भलं होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तुमची आमदारकी मिळाल्यानंतर मी जगाचा निरोप घेईन.
  •  एकीकडे माझ्याकडे बोलण्यासाठी माणसं पाठवली आणि दुसरीकडे माझ्यावर दुषणं लावली. पुतळे जाळले. घरावर दगडं मारण्याची भाषा केली, पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून कुणी पैदा झाला नाही. माझ्यावर प्रेम करणारी किती माणसं आहे, मी निघालो तर लोकांचा मधमाशांचा मोहोळ उठतो, माझ्यावर चालून आले तर ही लोक त्यांना डसून संपवून टाकतील.
  •  बाप काढले, माझाही बापही जिंवत आहे. माझी आई गेली. एकदा उद्धव ठाकरेंचा गावी असताना फोन आला होता, तेव्हा आईने सांगितलं, माझ्या बाळाला सांभाळा, त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तू इतका मोठा झाला तरी आई तुला बाळा म्हणायचे. मी रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा ती झोपलेली असायची. वडील कामाला गेलेले असायचे.

Eknath shinde became emotional while remembering his deceased children

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था