1971 elections : EVMs वरच्या निवडणूक विजयावर आक्षेप; पण बॅलेट पेपरवर बाईंचा नव्हे, शाईचा विजय झाला होता, तेव्हा…

1971 elections

 

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विपरीत निकाल लागल्यानंतर काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी नको ती EVMs असा नारा देत सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करून त्यासाठी देशव्यापी मोहीम चालविण्याची घोषणा केली. या निमित्ताने काँग्रेस सह सगळ्या विरोधी पक्षांना एक राजकीय प्रोग्राम हातात मिळाला. तो ते आपापल्या परीने चालवून बघतीलही, पण विरोधकांच्या या वड्याचे तेल वांग्यावर काढण्याच्या प्रकारामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका पुन्हा एकदा देशात चर्चेत आल्या.

पण बॅलेट पेपरवरच्या निवडणुका तरी या देशात कधी निर्विवाद राहिल्या होत्या का??, की त्यावेळी आत्ताच्या पेक्षा गैरप्रकार अधिक चालायचे याचा थोडा आढावा घेतला, तर भलतेच वास्तव भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने समोर आले.

त्यातून “बाईचा नव्हे, शाईचा विजय” ही 1971 ची निवडणूक आठवली. त्यावेळी इंदिरा गांधींच्या तरुण नेतृत्वा विरोधात सगळ्या विरोधकांनी मिळून एक महाआघाडी काढली होती. त्यामध्ये भारतीय लोकदल, भारतीय जनसंघ, संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष वगैरे पक्षांचा समावेश होता. चौधरी चरण सिंग, अटल बिहारी वाजपेयी, कर्पुरी ठाकूर, एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस वगैरे बड्या फायर ब्रँड नेत्यांचा त्या आघाडीत समावेश होता. काँग्रेसच्या विरोधामध्ये बाकीचे विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत म्हणून त्यांच्या मत विभाजनातून काँग्रेसचा विजय होतो असा सिद्धांत त्या नेत्यांनी त्यावेळी मांडला होता म्हणून काँग्रेस विरुद्ध एक महाआघाडी करून निवडणुकीच्या रण मैदानात उतरण्याची रणनीती त्यांनी आखून खरंच तशी महाआघाडी निवडणुकीत उतरवली होती. पण 1971 च्या निवडणुकीत या महाआघाडीचा दणकून पराभव झाला इंदिरा गांधींचाच मोठा विजय झाला. काँग्रेसला त्यावेळी लोकसभा निवडणुकीत 352 जागा मिळाल्या होत्या.


Sharad pawar मास्टर माईंड + जरांगेंचे नेहमीच माध्यमांमध्ये “मास्टर स्ट्रोक”; पण ऐनवेळी अवसानघातातून बाउंड्री वर कॅच आऊट!!


निवडणुकीत दणकून पराभूत झाल्यानंतर त्या वेळच्या महाआघाडीचे नेते असेच संतप्त झाले होते आणि त्यातून एक नव्या सिद्धांताचे पिल्लू बाहेर काढले होते, तो म्हणजे “हा बाईचा नव्हे, गाईचा पण नव्हे, तर शाईचा विजय आहे!!” हे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केल्याचे सांगितले गेले.

त्यावेळी बॅलेट पेपरवर निवडणुका होत्या. त्यामुळे इंदिरा गांधींनी रशियातून असे बॅलेट पेपर आणि शाई मागवली होती, जी विशिष्ट वेळेनंतर पुसलीत जाईल त्यातून इंदिरा गांधींनी काँग्रेसचा विजय मॅनेज केला आणि विरोधकांचा पराभव घडवून आणला, असा आरोप विरोधकांनी केला होता. अर्थातच त्यावर देशात मोठा गदारोळ माजला होता, तो त्यावेळी उपलब्ध असलेल्या फक्त प्रिंट मीडिया पुरता मर्यादित राहिला. पण तो निवडणुकीच्या इतिहासात मात्र नोंदला गेला.

आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरुद्ध असाच गदारोळ सुरू असून आता विरोधकांना म्हणजे काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांना बॅलेट पेपरवर निवडणुका हवे आहेत पण या निवडणुका देखील कधी निर्विवाद राहिल्याचा इतिहास नाही त्याचा वरच्या घटनेतून दाखला मिळतो त्याचबरोबर बॅलेट पेपरची अफरातफर करणे, मतपेट्या पळवणे, बूथ कॅप्चरिंग करून दणादणा बॅलेट पेपर आपलेच शिक्के मारणे, विरोधी मतदान झाले असल्याचा संशय असल्याच्या मतपेट्या जाळून टाकणे, असले प्रकार बॅलेट पेपर वरच्या निवडणुकांच्या काळातही घडतच होते.

1971 elections, ballot papers and Russian ink

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात