SBI Report : साक्षरतेचे प्रमाण 1 % वाढले, तर महिला मतदानात 25 % वाढ, महिला योजनांचा मोठा प्रभाव!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिला विषयक योजनांचा प्रभाव कसा पडला, या संदर्भातला एक अभ्यास अहवाल स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला असून त्यामध्ये एक मोठा सकारात्मक निष्कर्ष निघाला आहे. साक्षरतेचे प्रमाण जर 1 % वाढले, तर महिला मतदानाच्या प्रमाणात तब्बल 25 % वाढ झाली हा तो निष्कर्ष आहे!!

2024 च्या निवडणुकीमध्ये 1.8 कोटी महिला मतदान वाढले, तर 2014 आणि 2019 मध्ये 45 लाख महिला मतदान वाढले होते. त्यातून नीट 2024 च्या निवडणुकीत महिला मतदानात 25 % वाढ झाली.

स्टेट बँकेच्या अहवालात वेगवेगळ्या निकषांवर महिलांच्या मतदानासंदर्भात अभ्यास झाला त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून महिलांना घरे दिली. शौचालय बांधली. मुद्रा योजनेतून कर्जवाटप केली. या योजनांचा लाभ महिलांना झाला. त्याचा प्रभाव महिला मतदारांवर पडला. प्रधानमंत्री आवास योजनेतून तब्बल 74 % घरे महिलांच्या नावावर केली. याचा मोठा प्रभाव पडून महिलांचे मतदान 20 लाखांनी वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून निघाला. त्याचबरोबर शौचालय बांधणीतून महिला सुरक्षितता निर्माण झाली. त्यामुळे महिला मतदान 21 लाखांनी वाढले, तर मुद्रा योजनेतील कर्ज वाटपाचा सकारात्मक परिणाम होऊन तब्बल 36 लाख महिला मतदान वाढले असाही निष्कर्ष या अभ्यासातून निघाला.

स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे झाली, तरी भारतातल्या अनेक भागांमध्ये वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा देखील पोहोचल्या नव्हत्या. त्याचा दुष्परिणाम महिला विकासावर सर्वाधिक झाला होता. परंतु, सरकारने त्यावर लक्ष केंद्रित केल्याने महिलांचा लाभ झाला आणि त्याचा सकारात्मक परिणाम महिलांचे मतदान वाढण्यावर झाला, असाही निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे.

1 pc increase in literacy rate in India, leads to 25 pc rise in female voter’s turnout: SBI Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात